Gold Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. कधी सोने-चांदीच्या दरात वाढ तर कधी आजचा भाव, 12 February 2026: सराफा बाजारात आज पुन्हा एकदा मोठी हालचाल पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याच्या दरात तब्बल 1,200 रुपयांची घसरण झाली असून ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत झालेल्या या घटेमुळे दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल, डॉलरच्या तुलनेत रुपयातील हालचाल तसेच जागतिक आर्थिक परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. गुंतवणुकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले असले तरी सध्या नफावसुलीमुळे दरात घसरण झाल्याचे बोलले जात आहे.
24 कॅरेट सोन्याचा दर
गुरुवारी (12 फेब्रुवारी 2026) सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 12000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 15,96,000 रुपयांवरुन 15,84,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या दरात 1200 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,59,600 रुपयांवरुन 1,58,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (24 Carat Gold Rate Today)
- शहराचे नाव आजचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) कालचा सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम)
- मुंबई 1,58,400 1,59,600
- पुणे 1,58,400 1,59,600
- नागपूर 1,58,400 1,59,600
- कोल्हापूर 1,58,400 1,59,600
- जळगाव 1,58,400 1,59,600
- सांगली 1,58,400 1,59,600
- बारामती 1,58,400 1,59,600
22 कॅरेट सोन्याचा दर
तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 11000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 14,63,000 रुपयांवरुन 14,52,000 रुपये इतका झाला आहे. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1100 रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,46,300 रुपयांवरुन 1,45,200 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
18 कॅरेट सोन्याचा द
18 कॅरेट सोन्याच्या दरात 9000 रुपये प्रति 100 ग्रॅम इतकी घसरण झाली आहे. यामुळे 18 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅम दर 11,97,000 रुपयांवरुन 11,88,000 रुपये इतका झाला आहे. तर 10 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याच्या दरात 900 रुपयांनी घसरण झाली आहे. यामुळे हा दर 1,19,700 रुपयांवरुन 1,18,800 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे.
आजचा चांदीचा दर किती?
चांदीच्या दरात मात्र मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. चांदीच्या किमतीत तब्बल 5,000 रुपयांची वाढ झाली असून बाजारात उत्सुकता निर्माण झाली आहे. औद्योगिक मागणी वाढणे, तसेच गुंतवणुकीसाठी चांदीकडे वाढलेला कल यामुळे दर वाढल्याचे तज्ज्ञ सांगतात. इलेक्ट्रॉनिक्स, सौरऊर्जा आणि इतर उद्योगांमध्ये चांदीचा वाढता वापर ही दरवाढीमागील एक महत्त्वाची कारणे मानली जात आहेत. या तेजीमुळे चांदीचा दर 295000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला आहे.